Husband And Wife Murdered : कौटुंबिक वादाने घेतला पती-पत्नीचा जीव; एक अत्यवस्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

कौटुंबिक वादाने घेतला पती-पत्नीचा जीव; एक अत्यवस्थ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर (जि. अकोला) : कौटुंबिक वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन काल मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथे दोन ठार, तर एक गंभीर जखमी झाला. किशोर विठ्ठल गिरी (४२) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर पत्नी दुर्गा किशोर गिरी (३८) यांचा अकोल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, सिरसो येथील रहिवासी असलेल्या गिरी कुटुंबात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. शुक्रवारी या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या किशोर यांचा घटनास्थळी तर दुर्गा यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. दुर्गा यांची आई जिजाबाई निरंजन गिरी हाणामारीत गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा: जिला मुलगी म्हटले तिलाच केले गर्भवती; शेजाऱ्याचे कृत्य आले समोर

शुक्रवारी दुपारी दोन्ही कुटुंबात शाब्दिक वाद झाला. सय्यद जाबीर, अर्चना गिरी, बेबी मोहन गिरी व ईश्वर पुरी यांनी किशोर व दुर्गा यांच्या डोक्यावर सब्बलने व विळ्याने जोरदार हल्ला केला. यात हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सय्यद जाबीर, बेबी गिरी, अर्चना गिरी यांना ताब्यात घेतले.

मुख्य आरोपी ईश्वरचा पोलिस शोध घेत आहे. मृतांचा मुलगा रोहन गिरी याने ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस करीत आहे.

loading image
go to top