डॉक्टरांनी मुलीचा अहवाल दाखविल्यानंतर आईच्या पायाखालची जमीन सरकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

atyachar

जिला मुलगी म्हटले तिलाच केले गर्भवती; शेजाऱ्याचे कृत्य आले समोर

नागपूर : नवव्या वर्गात असलेल्या मुलीच्या अचानक पोटात दुखायला लागले. त्यामुळे आईने घाईगडबडीत डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. आईचा विश्‍वास बसला नाही. त्यामुळे डॉक्टरांना पुन्हा तपासायला सांगितले. डॉक्टरांनी अहवाल दाखविल्यानंतर आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने दवाखान्यात मुलीला मारहाण करायला सुरुवात केली. डॉक्टरांनी समजूत घातल्यानंतर थेट कळमना पोलिस ठाण्यात गेली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ४५ वर्षीय शेजाऱ्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमळण्यातील एका परिसरात कॅटरिंगचा व्यवसाय करणारे दाम्पत्य राहतात. त्यांना १५ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) आहे. ती नवव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिच्या घराशेजारी आरोपी मनीष मधुकर पराते (४५) हा पत्नीसह राहतो. त्याचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले असून, मूलबाळ नाही. तो नामांकित कंपनीत ड्रायव्हर आहे.

हेही वाचा: शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना हाणला टोला; म्हणाले...

त्याची अनेकदा रात्रपाळी ड्यूटी लागते. त्यामुळे अनेक दिवसांपासून रिया त्याच्या घरी झोपायला जात होती. जुलै महिन्यात मनीष हा रात्रपाळी ड्युटीवर गेल्यामुळे रिया त्याच्या पत्नीकडे झोपायला गेली. त्या रात्री दोन वाजता मनीष घरी आला. त्यावेळी पत्नी गाढ झोपलेली होती. त्यामुळे रियाला त्याने झोपेतून उठवले आणि चहा करून मागितला. त्यानंतर त्याने रियाशी अश्‍लील चाळे करायला सुरुवात केली. त्याने रियाला दुसऱ्या खोलीत उचलून नेले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला कुणालीही न सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे ती गप्प होती.

... अन् तिच्यावर नजर फिरली

निपुत्रिक असलेल्या मनीषने रियाला मुलगी मानले होते. परंतु, त्याची तिच्यावरच नजर फिरली. तो वारंवार तिच्या शरीराशी खेळायला लागला. मुलीनेही भीतीपोटी अत्याचार सहन केला. चार महिन्यांचा गर्भ राहिल्यानंतर मनीषचा काळा चेहरा समोर आला. ‘तो मी नव्हेच’ म्हणणाऱ्या मनीषला दोन फटके देताच कबुली दिली.

loading image
go to top