
Akola Crime
sakal
अकोला : पातूर तालुक्यातील ग्राम अंबाशी येथे घरगुती वादातून खुनाची घटना बुधवारी (ता.१०) दुपारी घडली. सासरच्या मंडळींनी जावयाचा काठ्या, चाकू व कुऱ्हाडीच्या साहाय्याने खून केला. नागेश पायरुजी गोपनारायण (४०) असे मृतकाचे नाव असून तो असोला फाटा येथे राहायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.