Akola : ६० हजार शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा!

दिवाळी तोंडावर, तरीही मदत वाटपाची कासवगती
Farmer
Farmeresakal

अकोला : जून ते जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी शासनाकडून १२३ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. सदर निधीचे वितरण तालुकास्तरावर सुरु असून शनिवार (१४) पर्यंत एक लाख पाच हजार १८७ शेतकऱ्यांपैकी केवळ ४५ हजार १४ शेतकऱ्यांच्या खात्यातच अतिवृष्टीची मदत जमा झाली आहे, तर उर्वरीत ६० हजार १७३ शेतकऱ्यांना दिवाळी तोंडावर असल्यानंतर सुद्धा अद्याप मदतीची प्रतीक्षाच आहे.

जून, जुलै महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. बाळापूर व अकोला तालुक्यात पावसामुळे शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. शेती पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूंग, उडीद, भाजीपाला या पिकांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. परिणामी शेती पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक त्यानंतर अंतिम अहवाल तयार करून शासनाला पाठवण्यात आला होता. त्यानुसार शासनाने शेती नुकसानीसाठी निधी मंजूर केला आहे.

सदर निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्यानंतर निधी तहसिलदारांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. परंतु त्यानंतर जवळपास एक आठवडा सदर निधीचे वितरण रखडले होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी जमा करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु अद्यापही एक लाख पाच हजार १८७ शेतकऱ्यांपैकी ६० हजार १७३ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदत जमा झाली नाही. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकरी मदतीची आस लावून बसले आहेत.

असे झाले होते नुकसान

 जिरायत क्षेत्र ; जिल्ह्यातील १ लाख चार हजार ५६३ शेतकऱ्यांचे ९ हजार ४७९.९४ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. त्यासाठी शेतकऱ्यांना १२३ कोटी ५ लाख २७ हजार रुपये मदत शासनाने दिली आहे.

आश्वासित सिंचनाखालील क्षेत्र ; या क्षेत्रातील १३० शेतकऱ्यांचे १०१.२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी २७ लाख ३२ हजार रुपयांचा निधी प्रशासनाला मिळाला आहे.

 बहुवार्षिक पिकाखालील क्षेत्र ; पावसामुळे १९५ शेतकऱ्यांचे ८४ कोटी १५ लाख रुपयांचे बहुवर्षिक पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाळी ३० लाख २९ हजार रुपये शासनाने वितरित केले आहेत.

जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ८८८ शेतकऱ्यांचे एकूण ९ हजार ६६५.२९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी १२३ कोटी ६२ लाख ८८ हजार रुपये शासनाने मंजूर केले आहेत. त्यामध्ये जिरायती क्षेत्र, आश्वासित सिंचनाखालील क्षेत्र, बहुवार्षिक पिकाखालील क्षेत्राचा समावेश आहे.

असे झाले मदतीचे वाटप

तालुका शेतकरी संख्या रक्कम

अकोला ३२६१ २ कोटी ९१ लाख

बार्शीटाकळी ५६४ २७ लाख ५६ हजार

अकोट ७५४२ ८ कोटी १५ लाख

तेल्हारा ३४५२ २ कोटी ९ लाख २८ हजार

बाळापूर २६०६६ ३० कोटी ४३ लाख ५ हजार

मूर्तिजापूर ४१२९ २ कोटी ५३ लाख ५२ हजार

एकूण ४५०१४ ४६ कोटी ३९ लाख ४१ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com