esakal | हतबल शेतकऱ्याने सोयाबीनच्या 15 एकराच्या उभ्या पिकात फिरवला ट्रॅक्टर!
sakal

बोलून बातमी शोधा

At Sangrampur, a farmer turned a tractor on a vertical crop of five acres.jpg

सोयाबीन उत्पादन खर्च निघत नसून शेतक-यांनी 15 एकरातील नैराश्य पोटी उभ्या सोयाबीन पिकात ट्रक्टर रोट्याव्हेटर फिरविले.

हतबल शेतकऱ्याने सोयाबीनच्या 15 एकराच्या उभ्या पिकात फिरवला ट्रॅक्टर!

sakal_logo
By
पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर (बुलढाणा) : तालुक्यातील बोडखा येथील महादेव आगरकर यांच्या बोडखा शिवारात १५ एकर शेतावर परतीच्या पावसाने बहरलेले सोयाबीन झाडांना शेंगा भरल्याच नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची घोर निराशी झाली. सोयाबीन उत्पादन खर्च निघत नसून शेतक-यांनी 15 एकरातील नैराश्य पोटी उभ्या सोयाबीन पिकात ट्रक्टर रोट्याव्हेटर फिरविले. सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक विळख्यात सापडले. 

हे ही वाचा : परतीच्या पावसापूर्वीच सिंचन प्रकल्प भरले

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे गरजेचे अशी मागणी यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. सोयाबीनच्या ७५% शेंगा पोकळ असल्याने तालुका खारपाण पट्ट्यात येत असून सोयाबीन उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना लावलेला खर्च निघत नसल्याचे वस्तुस्थिती असल्याने काळजावर दगळ ठेवून नैराश्य पोटी ट्रक्टर रोट्याव्हेटर फिरविले. 

हे ही वाचा : दसऱ्याच्या मुहूर्तापर्यंत शेतकऱ्यांचे पांढरे सोने घरात!
 

यावेळी भाजपा संग्रामपूर तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्याला धीर देत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते शेतात उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image