esakal | अकोट तालुक्यात आदिवासी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या; दुबार पेरणीचे संकट
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : आदिवासी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या; दुबार पेरणीचे संकट

अकोला : आदिवासी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या; दुबार पेरणीचे संकट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोट (जि. अकोला) : तालुक्यातील शहापूर येथील आदिवासी शेतकरी पती-पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करताना वाटेतच त्यांची प्राणज्योत माळवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. सूरज तुकाराम भारसाकडे (३५) व कविता सूरज भारसाकडे (३०) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहे. (Farmer-couple-commit-suicide-Akola-Farmer-news-Poison-taken-by-husband-and-wife-nad86)

सूरज भारसाकडे यांच्याकडे एक हेक्टर शेती होती; मात्र पावसाअभावी त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. आर्थिक परिस्थिती हलाकीची झाल्याने या दाम्पत्याने अखेर विष प्राशन करून आत्महत्या केली. या दाम्पत्याला एक मुलगा व दोन मुली असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

वीज पडून युवक ठार

अकोला : शेतातून घरी जात असताना वीज पडून १६ वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला. मृताचे नाव आदित्य किसनराव आपोतीकर असून, तो आपोती खुर्द येथील रहिवाशी आहे. रविवारी दुपारी २ वाजता दरम्यान अकोला तालुक्यातील आपोती शेत शिवारात जोरदार पाऊस झाला. या पावसात शेतातून घरी येत असताना आदित्य आपोतीकर याच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे युवक जागीच ठार झाला. युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

(Farmer-couple-commit-suicide-Akola-Farmer-news-Poison-taken-by-husband-and-wife-nad86)

loading image