esakal | भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : आगामी महापालिकेची निवडणूक जिंकणे अवघड असल्याचे संकेत भाजपला मिळाले आहेत. त्यामुळे चिंतेत असलेल्या भाजपच्या नेत्यांनी सेंटर पॉइंट येथे तातडीने बैठक बोलवून सर्वांना कामाला लागण्याचे निर्देश दिले. कोअर कमिटीच्या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, शहरातील सर्व आमदार, महापौर दयाशंकर तिवारी, मनपाचे सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे, मंडळ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. (Municipal-elections-Bjp-Nitin-Gadkari-devenra-Fadanvis-Nagpur-Nmc-election-nad86)

महापालिकेत पंधरा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मागील निवडणुकीत तब्बल १०८ नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. त्यामुळे सारेच निश्चिंत होते. चारच्या प्रभागामुळे आरामात निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांनी निवडणुकीनंतर प्रभागात फिरणेच बंद केले. चार नगरसेवकांमध्ये समन्वय नसल्याने अनेक प्रभागातील जनता प्रचंड नाराज आहे. त्याचा फटका इतरांनाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय भाजपचे जमिनीवर काम करणारे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक जिंकणे जेवढे सोपे वाटत आहे तेवढी नसल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

सन्मानाची वागणूक तरी द्या

बैठकीत ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद वाढवण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिल्याचे समजते. शहरात भाजपचे सुमारे पाच ते सात हजार कार्यकर्ते आहेत. सर्वांना महापालिकेची उमेदवारी किंवा पदे देणे अवघड आहे. अशा परिस्थिती त्यांना सन्मानजनक वागणूक मिळणे अपेक्षित असल्याचे एका नेत्याने सांगितले. दुसरीकडे जाणार नाही मात्र निवडणुकीत काम केले नाही तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो अशीही भीती वर्तविली जात आहे.

हेही वाचा: लहान मुलांनी केला चोराचा पाठलाग; आईचे दागिने वाचविले!

निष्क्रिय नेत्यांना बदला

सहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. सर्वांची समजूत काढा. त्या काय हवे नको ते बघा. साडेचार वर्षे जे नगरसेवक निष्क्रिय राहिले त्यांना बदला, असे मतही बैठकीत अनेक नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते.

(Municipal-elections-Bjp-Nitin-Gadkari-devenra-Fadanvis-Nagpur-Nmc-election-nad86)

loading image