akola
akola sakal

Farmer News : ‘कस्तुरी’चा ‘आत्मजागर’,आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत करून स्वयंपूर्ण बनवणार

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा विस्कटलेला संसार... तिची शून्यात गेलेली नजर... मनात उठलेले असंख्य प्रश्न... आजूबाजूला उघडी पडलेली बाळं... म्हातारे आईवडील

अकोला -समाजातील वंचित व दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी सातत्याने विविध सेवाभावी उपक्रम राबविणाऱ्या ‘कस्तुरी’ या संस्थेने अकोला जिल्ह्यातील जानेवारी २०२३ नंतर आत्महत्या केलेल्या परंतु शासकीय मदतीसाठी निकषात न बसणाऱ्या १९ शेतकऱ्यांच्या वारसांना स्वयंपूर्ण बनवण्याकरिता ‘आत्मजागर’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा विस्कटलेला संसार... तिची शून्यात गेलेली नजर... मनात उठलेले असंख्य प्रश्न... आजूबाजूला उघडी पडलेली बाळं... म्हातारे आईवडील असं विदारक दृश्य असलेली... मोडकळीस आलेली घरं... कस्तुरीनं हे नेमके निःशब्द असलेले उसासे ऐकले... त्यांचं मन कस्तुरीला कळलं आणि अशा महिलांना स्वयंसिद्ध करून त्यांच्या पायावर त्यांना उभं करण्याचा अल्पसा प्रयत्न कस्तुरी ‘आत्मजागर’ या उपक्रमातून करणार आहे.

या सोहळ्याचं आयोजन रविवार, ता. १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता कस्तुरीच्या गायगाव मार्गावर असलेल्या परिसरात करण्यात आलं असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विधानपरिषद सदस्य वसंतराव खोटरे आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल, प्राचार्य डॉ. शांताराम बुटे आणि पातूरच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती शिलाताई गहिलोत राहतील.

akola
Mumbai local : मुंबई लोकलमुळे जगाला मिळाला हा शब्द !

संस्थेच्या दानशूर मंडळीच्या आर्थिक सहकार्यावर आधारित हा प्रकल्प यशस्वी व्हावा यासाठी कस्तुरीचे कार्यकारी मंडळ प्रयत्नशिल असून, संस्थेचे पदाधिकारी यशवंत देशपांडे, संजय ठाकरे, संजय गायकवाड, राजेश्वर पेठकर, गोविंदसिंह गहिलोत विशेष परिश्रम घेत असल्याचे कस्तुरीचे अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले यांनी सांगितले.

akola
Dr M S Gosawi Death : शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन; शरद पवारांनी घेतलं अंत्यदर्शन

शासनाने नाकारलेल्यांना देणार आधार!

या कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्महत्या केलेल्या, परंतु शासकीय मदतीसाठी निकषात न बसणाऱ्या कुटुंबातील महिलांना पाच हजारांची आर्थिक मदत आणि भावी आयुष्यात त्यांना स्वबळावर उभं करण्याचा आश्वासन हेच ‘आत्मजागर’चं प्रयोजन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com