
बाळापूर : राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाला युवा शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी होत आहे. अशातच बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील युवा शेतकऱ्यांनी राज्य सरकारवर टीका करत चक्क गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
हातरुण येथील युवा शेतकऱ्यांनी शासनाला गांजाच्या शेतीला परवानगी मिळण्यासंदर्भात गावचे तलाठी ए. आर. भटकर यांच्या मार्फत निवेदन दिले आहे. किराणा सुपर मार्केट व मॉल मधुन विक्रीमुळे युवा पिढी व सामान्य नागरिक व्यसनाधीन झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे. त्यामुळे हा निर्णय शासनाने रद्द करावा, अन्यथा शेतकऱ्यांना गांजा व मोहाची झाडे लावण्याची परवानगी द्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळत चालले आहे. त्यात कोविड आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी आपण सरसकट शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी सशर्त परवानगी देऊन त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी युवा वर्ग व शेतकरी इशरत जहागीरदार, अशरफ खान, काझीजी मेहंदी हसन, शेख शाकीर, डॉक्टर प्रदीप पाटील, प्रदीप नसुर्डे. कलीमोद्दीन व मुरलीधर माडी यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.