Buldhana; खरिपात सोयाबीन खातेय भाव, घरगुती बियाणे नसल्याने शेतकर्‍यांची अडचण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीन

Buldhana; खरिपात सोयाबीन खातेय भाव, घरगुती बियाणे नसल्याने शेतकर्‍यांची अडचण

डोणगाव (जि.बुलडाणा) : मृग नक्षत्र अवघ्या काही दिवसावर येऊन थांबल्याने खरिपाच्या पेरणीच्या तोंडावरील शेती मशागत करण्यासाठी बळीराजा सध्या शेतातील बांधावर कंबर कसून उभा असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु, यंदा जास्तीत जास्त पेरा हा सोयाबीनचा असल्याने शेतकर्‍यांमध्ये बियाण्यावरुन आता चिंता व्यक्त होत असून, प्रक्रिया केले बियाणे बाजारात महाग असल्यामुळे शेतकर्‍यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. (Farmers in Buldana do not have domestic soybean seeds)

ग्रामीण भागातील शेतकरी नेहमीच दरवर्षी सोयाबीन, तूर, उडीद, मूग याचीच काही प्रमाणात साठवण करून पुढच्या वर्षी पेरणीसाठी बियाणे वापरतात. मात्र, गेल्या वर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी पावसाने आपली हजेरी लावली होती. त्यामुळे सोंगण्याच्या वेळेस आलेल्या पावसाने शेतकर्‍यांना आपले अर्धवट भिजलेली सोयाबीन मातीमोल भावाने विकायचे लागले होते. आता पेरणीच्या तोंडावर 3000 ते 3500 रुपये विकलेली सोयाबीन 8000 हजार ते 8500 हजार रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी करावी लागत आहे.

हेही वाचा: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, आठवड्यातून चार दिवस धावणार हावडा रेल्वे

तर दुसरीकडे कृषी केंद्रावरून प्रक्रिया केलेले बियाणे विकत घ्यायचे म्हटले तर त्याचेही भाव गगनाला भिडल्या सारखेच आहे. कुठे मनमानी तर कुठे पिळवणूक होत असल्याचेही चित्र डोणगाव परिसरातील कृषी सेवा केंद्रावर पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे . दुकानात गेले तर कुठे 3300 रुपये तर कुठे 3350 रुपये प्रती बॅग या भावाने सोयाबीन बियाणे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. रासायनिक खते घेण्यासाठी कास्तकाराची लगबग पेरणी सोबतच महत्वाचे असते.

हेही वाचा: किसानपुत्र पाळणार शेतकरी पारतंत्र्य दिवस

रासायनिक खत, सध्या रासायनिक खतावर जास्त जोर देऊन जास्तीचे उत्पन्न वाढीसाठी रासायनिक खतांचा जास्तीत जास्त वापर शेतकर्‍याकडून केला जाते याची खरिपाच्या पेरणीसाठी चांगल्या व उत्तम प्रतीचे रासायनिक खत मिळवण्यासाठी शेतकर्‍यांना धडपड करावी लागत आहे. मृग नक्षत्रात जास्त पाणी झाल्यास शेतापर्यंत बि-बियाणे पोहोचवन्यास त्रासदायक ठरते. त्यामुळे अगोदरच आपल्या शेतावरील घरात बि-बियाणे साठवून योग्य वेळेची वाट पाहणे हि प्रक्रिया सध्य शेतकरी वर्गात सुरू आहे.

हेही वाचा: लागवडीचा खर्चही निघाला नाही: लाखो रुपयांचा माल गेला वाया

यंदा सोयाबीनचा पेरा बहुतांश शेतकरी करत असल्यामुळे भाव गगनाला भिडले आहे. गेल्या वर्षी पाऊस सोंगणीच्या वेळी आल्यामुळे यंदा घरगुती बियाणे पेरणीसाठी नाही. आधीच कोरोना संकट आणि आता आर्थिक बजेट नसल्यामुळे उसनवारी करून पेरणीची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. सोयाबीन बियाणे शासनाने उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करून देणे गरजेचे आहे.

- शैलेश मधुकर पळसकर, शेतकरी, डोणगाव.

संपादन - विवेक मेतकर

Farmers in Buldana do not have domestic soybean seeds

loading image
go to top