esakal | बाजार समित्या बंद शेतकरी अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद

बाजार समित्या बंद शेतकरी अडचणीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : केंद्र सरकारने मूग सोडून इतर सर्व कडधान्याच्या साठेबाजीवर मर्यादा आणले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे व्यापारी वर्ग त्याचा विरोध करत आहेत. दरम्यान, पश्चिम विदर्भातील सोयाबीनची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशीम कृषी उत्पन्न बाजार समिती सह जिल्ह्यातील सहा बाजार समित्या अनिश्चित काळासाठी बंद आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ बाजार समिती बंद असल्याने, बाजार समितीमध्ये करोडोचे व्यवहार ठप्प झाले आहेत. (Farmers in trouble closing market committees)

हेही वाचा: विद्यार्थ्यांची क्षमता सेतू कोर्समधून तपासणार

केंद्र सरकारने मूग वगळता सर्वच कडधान्यांच्या साठेबाजीवर निर्बंध आणले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याची निषेध नोंदवण्यासाठी व्यापारी संघटनांनी बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजार पेठ समजली जाणारी वाशीम कृषी उत्पन्न बाजार समिती सह जिल्ह्यामधील मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, मालेगाव, रिसोड या सर्वच बाजार समित्या बंद राहणार आहेत.

व्यापाऱ्यांकडून केंद्र सरकारच्या या धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. बाजार समिती बंद असल्याने, बाजार समितीमध्ये शुकशुकाट पसरला आहे. यामुळे हजारो क्विंटल धान्यांची उलाढाल ठप्प झाली असून, शेतकऱ्यांना आपला शेतमाल खासगी व्यापाऱ्याला विकावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता आता वाढली आहे.

संपादन - विवेक मेतकर

(Farmers in trouble closing market committees)

loading image