esakal | अकोल्यात शेतकरी पुत्रांचा अनोखा ‘व्हॅलेंटाईन डे’; हातात काटेरी गुलाब घेऊन केलं आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1613316311762,"A":[{"A?":"I","A":54,"B":757.9716220304233,"D":148.0283779695767,"C":45.485083412469926,"a":{"B":{"A":{"A":"MAEVuOEYQxo","B":1},"B":{"A":-3.55271

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने शेतकरी जागर मंचच्या शेतकरी पुत्रांनी रविवारी अकोल्यात सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाईन हे एक अनोखे आंदोलन अत्यंत शांततेने केले व त्या दरम्यान नवीन शेतकरी कायद्यांना असलेला विरोध दाखविला.

अकोल्यात शेतकरी पुत्रांचा अनोखा ‘व्हॅलेंटाईन डे’; हातात काटेरी गुलाब घेऊन केलं आंदोलन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः केंद्र सरकारने केलेल्या नवीन तीन कृषी कायद्यांचा विरोध दर्शवित, ‘सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाईन’ हे अनोखे आंदोलन जिल्ह्यातील शेतकरी पुत्रांनी शेतकरी जागरमंचच्या नेतृत्‍वात रविवारी (ता.१४) अकोल्यात केले. शेकडो शेतकरी पुत्रांनी हातात काटेरी गुलाब घेऊन या आंदोलनात सहभाग नोंदविला. 

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने शेतकरी जागर मंचच्या शेतकरी पुत्रांनी रविवारी अकोल्यात सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाईन हे एक अनोखे आंदोलन अत्यंत शांततेने केले व त्या दरम्यान नवीन शेतकरी कायद्यांना असलेला विरोध दाखविला. आता शेतकरी पुत्र या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले व टप्प्याटप्याने ते आंदोलन अधिक तीव्र करतील, असे या दरम्यान तरुण शेतकरी पुत्रांनी सांगितले. जगभरामध्ये तरुणाई हा प्रेमाचा उत्सव साजरा करीत असताना अकोल्यातील तरुण मात्र हातात काटेरी गुलाब घेऊन त्यांच्या व्हॅलेंटाईनसाठी रस्त्यावर उतरलेले दिसले. 

हेही वाचा - ‘मुलांनो, आम्हाला माफ करा; आमचे मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा’ अशी चिठ्ठी लिहून दाम्पत्याची...

कोणत्याही प्रकारच्या राजकीय घोषणा न देता फक्त आपल्या शेतकरी बापाच्या संघर्षाचा विजय व्हावा, या एकाच हेतूने तरुणाई रस्त्याचा दोन्ही बाजूने असलेल्या दुकानदार व नागरिकांना प्रेमाचा संदेश देत शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी आग्रही भूमिका मांडताना दिसले. शहराच्या मध्यवर्ती महात्मा गांधी मार्गापासून सुरू झालेल्या आंदोलनास नागरिकांनी सुद्धा समर्थन दिले. 

आंदोलनादरम्यान तरुणाईने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊन तेथे उपस्तित स्वयंसेवकाना शुभेच्छा पत्र व गुलाब पुष्प देऊन नम्रपणे शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याकरिता केंद्र सरकारला प्रभावित करण्याची विनंती केली. मार्गातील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात सुद्धा अशाच प्रकारे शेतकरी पुत्रांनी गांधीगिरी केली. जुने बसस्टँड, नवीन बसस्टँड व जिल्हाधिकारी निवास या ठिकाणी सुद्धा आपले म्हणणे मांडत शेतकरी जागर मंचाचे शेतकरी पुत्र निवेदनासह अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. 

हेही वाचा - महाराष्ट्रात सध्या ’हनीमून सरकार’; आमदार मदन येरवारांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा  

आंदोलनाच्या पुढील टप्यात किसान कैफियत ही शेतकऱ्यांची महापंचायत २० फेब्रुवारी रोजी अकोल्यातील खुले नाट्य गृह येथे दुपारी २ वाजता करण्यात आली असून, या महापंचायतीस शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी शेतकरी पुत्रांनी केले.

संपादन - अथर्व महांकाळ