

Urea Shortage Concerns Resurface as Farmers Spend Night Outside Fertilizer Shops
sakal
अकोट: 'युरियाचा मुबलक साठा असून, अफवांना बळी पडू नका' असा दावा प्रशासन करीत असला तरी, अकोटमध्ये कृषी सेवा केंद्र बाहेर विपरित परिस्थिती पहायला मिळत आहे. पीक वाढीसाठी आवश्यक असलेला युरिया मिळविण्यासाठी शेतकरी सलग बारा-बारा तास रांगेत उभे राहत असूनही युरियाची गोणी मिळत नसल्याने प्रशासनाचे दावे फोल ठरताना दिसत आहे.