Short Circuit : शॉकसर्कीटमुळे घराला आग, बापाने धाव घेतली; मुलाला वाचवताना दोघांचाही दुर्दैवी मृत्यू
Akot Fire : अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत वडील आणि नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वणी वारुळा, (जि. अकोला) : शॉक सर्कीटमुळे लागलेल्या आगीत गंभीररित्या भाजलेल्या बाप-लेकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना ता. २४ मे रोजीच्या रात्रीला अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे घडली.