

amol mitkari
अकोला - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार अमोल मिटकरी यांनी सचिदानंद सिंह यांच्या अलीकडील वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, त्यांच्या वक्तव्यामागील 'बोलता धनी' कोण आहे, याचा शोध घेतला गेला पाहिजे, अशी मागणी केली. तसेच एका महिला नेतृत्वाला लक्ष्य करून नियोजनबद्ध पद्धतीने बदनामीचे कटकारस्थान रचले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.