esakal | दोन कुटुंबात हाणामारी, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime

दोन कुटुंबात हाणामारी, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि. बुलडाणा) : घरगुती कारणावरुन किरकोळ वाद झाल्याची घटना तालुक्यातील चिंचपूर येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन हिवरखेड पोलिसांनी (hiwarkhed police khamgaon) सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. (FIR filed against six people in two family dispute case in khamgaon of buldana)

हेही वाचा: 'ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाहीतर PM फंडमधून प्लांट का सुरू केले?'

रुकसार परवीन शेख सलमान (२०) रा.चिंचपूर यांनी हिवरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांची सासू शहिदाबी व जाऊ मुन्नी परवीन यांच्यात दोन दिवसांपूर्वी घरगुती कारणावरुन वाद झाला होता. त्यामुळे शहिदाबी हिने सुरत येथील माहेरच्या नातेवाईकांना फोनद्वारे माहिती दिली. त्यावरुन शे.साजऊद्दीन समद व शाहरुख मोहमद नईम शाह सुरतवरून आले व रुकसान परवीन यांच्या पतीच्या पोटात चाकू वार करून जखमी केले. तसेच शाहरुखने त्यांच्या सासऱ्याच्या पाठीवर काठी मारुन जखमी केले. या तक्रारीवरुन पोलिसांनी उपरोक्त दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला.

तर शहनाजबी शे.समद (५०) रा.सुरत यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, त्या मुलगी व वडिलांना भेटण्यासाठी आल्या असता मुलीच्या घरासमोरुन वडिलांच्या घराकडे जात होत्या. त्यावेळी त्यांना बोलावले असता 'प्रथम वडिलांना भेटून येते' असे त्यांनी म्हटले. यावेळी सईदाबी शेख बब्बु हिने 'तू कशी येत नाही ते पाहते' असे म्हणून शिवीगाळ करुन केस धरुन पाडले तर शेख बब्बु शेख हसन याने त्यांच्या मुलाला काठीने मारहाण केली तर मुलगी वाद सोडविण्यासाठी आली असता रुकसाबी शेख सलमाने मारहाण केली. तसेच रूकसारबी व शेख जावेद यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरुन उपरोक्त चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image