esakal | 'ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाहीतर PM फंडमधून प्लांट का सुरू केले?'
sakal

बोलून बातमी शोधा

nitin raut

'ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाहीतर PM फंडमधून प्लांट का सुरू केले?'

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा (oxygen crisis in second wave of corona) भासत होता. ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे (oxygen express) अनेक राज्यात ऑक्सिजन पुरविण्यात आले. मात्र, आता केंद्र सरकारने दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी कोणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती पावसाळी अधिवेशनात दिली आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. त्यावरूनच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (minister nitin raut) यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. (minister nitin raut criticized bjp government over oxygen crisis issue)

हेही वाचा: 'पंकजा मुंडे पुढच्याही जन्मी भाजपच्याच सदस्य'

राऊत यांनी ट्विट करत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ते म्हणाले, ''ऑक्सिजनअभावी कुणी मेलं नाही तर इतक्या देशांमधून कॉन्संट्रेट का मागवलं? पीएम फंडातून ऑक्सिजन प्लांट का सुरू केले? रेल्वेमंत्री ऑक्सिजन एक्सप्रेसचे फोटो ट्विटरवर का टाकत होते? गरजूंना ऑक्सिजन पुरवणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची चौकशी का झाली? असं हे सरकार किती खोटं बोलणार आहे?''

लोक ऑक्सिजनवाचून तडफडत होते. मात्र, सर्व पातळीवर अपयशी ठरलेल्या सरकारला त्याची चिंता नाही. आग्रा येथे एका महिलेने आपल्या पतीला तोंडाद्वारे श्वास भरून ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला होता. हे देखील केंद्र सरकार लवकरच विसरले का? असा सवालही यावेळी नितीन राऊत यांनी उपस्थित केला. दरम्यान, देशात ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू झाला, असे वक्तव्य असलेला नितीन गडकरींचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तोच व्हिडिओ ट्विट करत गडकरी आपल्या सरकारसोबत सहमत नाहीत का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

आम्हाला राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनीच आकडेवारी दिली आहे. त्या आकडेवारीत ऑक्सिजनमुळे मृत्यू झाल्याची कोणतीच नोंद नाही. आरोग्य हा राज्य सरकारच्या अखत्यारित असलेला विषय असल्याचंही केंद्राने सभागृहात सांगितलं होतं.

नेमकं काय म्हटलं केंद्र सरकारने?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूची नोंद करण्यासाठीची मार्गदर्शक सूचना दिली होती. त्यानुसार राज्यांकडून आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रत्येक दिवशी आकडेवारी दिली जाते. आतापर्यंत यामध्ये ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची आकडेवारी कोणत्याच राज्याने दिलेली नाही अशी माहिती अधिवेशनात देण्यात आली.

loading image