esakal | मुख्य वीज वाहिनी तुटल्याने आग
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्य वीज वाहिनी तुटल्याने आग

मुख्य वीज वाहिनी तुटल्याने आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


कनका (जि.बुलडाणा) : मेहकर तालुक्यातील कनका येथे 16 एप्रिलला सकाळी 11 वाजेदरम्यान अचानक शॉर्ट सर्किट होऊन कृषी पंपाच्या मुख्य वीज वाहिनीचे तार तुटून खाली पडल्याने अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने उग्ररूप धारण केले. परंतु, गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे आग विझविण्यात यश आले.


सदर घटनेत कोणतेही नुकसान झाले नसून अगदी गावालगत आग लागल्याने नागरिकांची पळापळ झाली. ग्रामपंचायतचे टँकर त्याच परिसरात पाणीपुरवठा करत असताना वेळीच पाणी मिळाल्याने थोडक्यात ही आग आटोक्यात आणण्यात नागरिकांना यश आले. गावातील व शेतातील कृषीपंपाच्या विजेच्या तारा अनेक ठिकाणी लोंबकळत आहे. शेतकर्‍यांच्या शेतातून गेलेल्या वीज वाहिनी तारांमुळे शेती काम करण्यास शेतकर्‍यांना मोठा अर्नथ निर्माण होत आहे. तर लोंबकळत असलेल्या तारा बदल वीजवितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांना अनेक वेळा गावकर्‍यांनी माहिती देऊन ही याकडे मात्र वीजवितरण कंपनीचे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वीजवितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन गावातील व शेतातून गेलेल्या लाईनच्या तारांची लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी वीजवितरण कंपनीचे ग्राहक व शेतकरी करीत आहे.


शेतकर्‍यांना लोंबकळत असलेल्या तारा मुळे शेतीमशागत करणे कठीण झाले आहे. शेतातील लोंबकळत असलेल्या तारा मुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी वीजवितरण कंपनीने या बाबीकडे जातीने लक्ष द्यावे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
- अनिल बोरकर, जिल्हाउपाध्यक्ष, स्वाभिमानी, कनका.