Kojagiri Pournima 2025: सुपरमून आज; चांदोबा होणार मोठा, कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह, सोबत दोन ग्रहांची युती
First Supermoon of the Year to Grace Kojagiri Pournima: अकोलात सोमवारी पहिला सुपरमून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिसणार आहे. या रात्री चंद्रासोबत ग्रह शनी आणि दूरवर असलेली देवयानी आकाशगंगाही नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल.
अकोला : या वर्षातील पहिला सुपरमून सोमवारी (ता. ६) कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पाहता येईल. यावेळी पौर्णिमा दोन दिवस असून, सूर्यमालेतील सर्वात सुंदर व वलयांकित ग्रह शनी रात्रभर चंद्रा सोबत असेल.