अरे बापरे! एकाच दिवशी पाच कोरोना बळी; या जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 64 वर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

शनिवारी दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३२३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २९६ अहवाल निगेटिव्ह तर २७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी दिवसागणिक वाढत असतानाच आता कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ६४ वर जाऊन पोहचली आहे. अशातच शनिवारी (ता.२०) पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर दिवसभरात २७ नव्या कोरोनाग्रस्त आढळले आहेत.

शनिवारी दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३२३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २९६ अहवाल निगेटिव्ह तर २७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान आज सायंकाळी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील ४ जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर उर्वरित ६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आज पाच जणांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या ११६३ झाली आहे. आतापर्यंत ३४७ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

महत्त्वाची बातमी - ‘तू मला आवडतेस’ असे म्हणत शेतमालकानेच केला कामावर असणाऱ्या महिलेचा...

आजपर्यंत एकूण ८३४४ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८०२२२, फेरतपासणीचे १३४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ८३४१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या ७१७८ आहे. तर पॉझिटिव्ह अहवाल ११६३ आहेत.

नव्या २७ रुग्णांची भर
आज दिवसभरात २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालात २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नऊ महिला व सोळा पुरुष आहे. त्यात आदर्श कॉलनी येथील चार, शंकर नगर, अशोक नगर, न्यु साई नगर, जूने शहर येथील प्रत्येकी दोन, तर रामदास पेठ, अकोटफैल, बोरगांवमंजू, मूकूंदवाडी, हरिहरपेठ, हैदरपूरा, कच्ची खोली, खदान, शास्री नगर, गायत्री नगर, सोनटक्के प्लॉट, सिंधी कॅम्प व बुलडाणा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन्ही पुरुष आहेत. त्यातील जवाहर नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

पाच मृत्यूची नोंद
दरम्यान शनिवारी उपचार घेताना ५ रुग्णाचा मृत्यू झाला. त्यापैकी शंकर नगर, अकोटफैल येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून ते १६ जून रोजी दाखल झाले होते, गुलजारपूरा येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून, ते १६ जून रोजी दाखल झाले होते, पातूर येथील ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून ती १५ जून रोजी दाखल झाले होती, मोठी उमरी येथील ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून ते ८ जून रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल झाले होते त्याना ओझान हॉस्पीटल येथे १४ जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू ओझोन हॉस्पीटल येथे आज झाला आहे, अकबर प्लॉट, अकोट येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून, ते ५ जून रोजी दाखल झाले होते.

कोरोना अपडेट

  • एकूण पॉझिटिव्ह अहवाल-११६३
  • मृत्यू-६३
  • आत्महत्या-१
  • डिस्चार्ज- ७५२
  • दाखल रुग्ण - ३४७ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five corona patient death on the same day in akola district akola marathi news