Seed festival : यंदा बियाणे महोत्सवाचा विसर;शेतकऱ्यांचा प्रतिसाद तरीही दुर्लक्षच!

गेल्या दोन वर्षात भरघोस प्रतिसाद मिळालेल्या जिल्हास्तरीय बियाणे महोत्सवाचे यंदा अद्यापही आयोजन झालेले नाही. एकीकडे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हयात कृषीवसंत हा अभिनव उपक्रम सुरु केला.
Seed festival
Seed festival sakal
Updated on

अकोला : गेल्या दोन वर्षात भरघोस प्रतिसाद मिळालेल्या जिल्हास्तरीय बियाणे महोत्सवाचे यंदा अद्यापही आयोजन झालेले नाही. एकीकडे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हयात कृषीवसंत हा अभिनव उपक्रम सुरु केला. मात्र, जिल्हयात सुरु असलेला बियाणे महोत्सवाचा यंदा विसर पडला की काय असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

खरीप हंगामात शेतकरी घरचे बियाणे वापराकडे वळू लागलेले आहेत. दरवर्षी बाजारपेठेतून नवीन बियाणे विकत आणण्याऐवजी घरचे बियाणे बीजप्रक्रीया करून वापरले तरीही उपयोगी पडते. कृषी विभागही याची जनजागृती करीत असतो. मागील दोन-तीन वर्षात अनेक शेतकरी घरचेच बियाणे वापरत आहेत. अशा शेतकऱ्यांना या बियाणे महोत्सवातून शेतकऱ्यांनी तयार केलेले बियाणे खरेदी करणे सोयीचे जात होते. उत्पादीत केलेले बियाणे घेऊन अनेक शेतकरी या महोत्सवात सहभागी सुद्धा व्हायचे. मागील दोन वर्षात झालेल्या महोत्सवात बियाणे विक्रीत लाखोंची उलाढाल झाली होती. प्रशासनानेच तशी आकडेवारीही त्या-त्यावेळी माध्यमांना दिली.

बच्चू कडू पालकमंत्री असताना हा उपक्रम सुरु करण्यात आला. मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी हा उपक्रम राज्यस्तरावर प्रत्येक जिल्हयात भरवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू असेही जाहीर केले होते. यंदा जिल्हयात काही तालुक्यात कृषी विभागाने बियाणे महोत्सव घेतला. तेल्हारा, पातूर तालुक्यातील महोत्सवाला चांगला प्रतिसादही मिळालेला आहे. अकोल्यात जिल्हा मुख्यालयी महोत्सव झाला असता तर आणखी मोठी सुविधा व उलाढालही होऊ शकली असती.

बियाणे दरवाढीची झळ

बाजारपेठेत बियाण्यांचे दर यंदा कमालीचे वाढलेले आहेत. त्यातही सोयाबीनसारख्या मुख्य पिकाचे बियाणे जास्त महाग झालेले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या बियाणे महोत्सवाच्या माध्यमातून घरगुती बियाणे खरेदीची संधी मिळाली असती. दरम्यान अर्धा जून महिना लोटला तरीही हा बियाणे महोत्सव आयोजित झालेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे आयोजन न करण्यामागे नेमके कुठले कारण घडले याची माहिती मिळू शकली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.