Ajit Pawarsakal
अकोला
Ajit Pawar : जिल्ह्यात राष्ट्रवादी दादा गटाला ताकद
Akola Politics : अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला.
अकोला : जिल्ह्यातील राजकीय चित्र झपाट्याने बदलत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अकोला महानगरपालिकेचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक मदन भरगड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ते १२ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश करीत आहेत. या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे. मदन भरगड यांच्या प्रवेशामुळे अकोल्यातील राजकीय समीकरणांना नव्या दिशा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची ठरत आहे.