Former MLA Haridas Bhade : माजी आमदार हरिदास भदे ठाकरे गटाच्या संपर्कात; मातोश्रीवर घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार हरिदास भदे हे राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता.
MLA Haridas Bhade
MLA Haridas BhadeSakal

अकोला - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार हरिदास भदे हे राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबई येथे मंगळवारी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली असून, ता. २ सप्टेंबरला ही बैठक होणार आहे. त्यानंतर पक्ष प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाईल.

माजी आमदार हरिदास भदे हे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन भारिप-बहुजन महासंघ व विद्यामान वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर दोन वेळा निवडून आले होते.

सन २००४ आणि २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते विजय झाले होते. सन २०१४ च्या निवडणुकीत त्यांना भाजपचे रणधीर सावरकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर २०१९ मध्येही ते पराभूत झाले होते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

मात्र, तेथे त्यांचे मन रमले नाही. सिरस्कार यांनी यापूर्वीच राकाँला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता माजी आमदार हरिदास भदेही लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राकाँला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

त्यासाठी त्यांनी मंगळवारी शिवसेनेचे अकोला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत माजी आमदार भदे यांनी पक्ष प्रवेशावर चर्चा करण्यासाठी वेळ मागवून घेतली आहे. त्यानुसार ता. २ सप्टेंबर रोजी त्यांची पक्ष प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा होणार असून, त्यानंतर पक्ष प्रवेशाची तारीख ठरविली जाणार असल्याची माहिती आहे.

माजी आमदार हरिदास भदे हे शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत. मुंबई येथे त्यांनी भेटीसंदर्भात वेळ मागितली आहे. पुढच्या भेटीत पक्ष प्रवेशाबाबत चर्चा होईल. तोपर्यंत ते कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. त्यानंतर पक्ष प्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

- गोपाल दातकर, जिल्हा प्रमुख, शिवसेना, अकोला

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेवू. अद्याप पक्ष प्रवेश घेतला नाही. पुढील बैठकीत चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ.

- माजी आमदार हरिदास भदे, अकोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com