

BJP and Shiv Sena Back UBT Leader Raju Bhandurge for Deputy President Post
Sakal
वाशीम : नगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भारतीय जनता पक्षात थेट सामना झाला होता. मात्र, या राजकीय लढाईतील सैनिक अजून स्थिरावले नसताना सत्तेसाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. वाशीम नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी ठाकरे सेनेचे नगरसेवक राजू भांदुर्गे यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी न दिल्याने ठाकरे सेनेला अप्रत्यक्ष मदत मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.