अकोला : बाल संरक्षण कक्षाने रोखले चार बालविवाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Four child marriages prevented by child protection cell akola

अकोला : बाल संरक्षण कक्षाने रोखले चार बालविवाह

अकोला : जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या वतीने धडक कारवाई करून गेले सात दिवसांमध्ये चार बालविवाह रोखण्यात आले. या चारही मुलींच्या पालकांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांनी दिली आहे.

पहिली कारवाई ता. ४ मे रोजी मधापूरी ता. मूर्तिजापूर येथे करण्यात आली. यासाठी मूर्तिजापूर पोलिसांची मदत घेण्यात आली. ता.५ मे रोजी हातोल ता. बार्शीटाकळी येथे तर ता. १० मे रोजी वडगाव ता. बार्शीटाकळी येथे एकाच कुटुंबातील दोन विवाह रोखण्यात आले. या प्रकरणी पिंजर पोलिस स्टेशनची मदत घेण्यात आली. लग्न होत असलेल्या अल्पवयीन मुलींच्या वयाची माहिती त्यांच्या शाळेतून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना समुदेशन करून समजावण्यात आले. बालविवाह अधिनियम २००६ बाबत माहिती देण्यात आली. पालकांकडून हा बालविवाह थांबविण्यासंदर्भात हमीपत्र घेण्यात आली.

या कारवाईत जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे, चंद्रशेखर चेके, राजू लाडुलकर, सुनील सरकटे, निती अहिर, सतिश राठोड, सचिन घाटे, योगेंद्र खंडारे, सुनिल लाडुलकर, रेवत खाडे, संगिता अभ्यंकर, रेशमा मुरुमकार तसेच स्थानिक पोलिसांनी सहकार्य केले. आपल्या परिचयात, परिसरात बालविवाह होत असल्याबाबत 1098 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी केले आहे.

Web Title: Four Child Marriages Prevented By Child Protection Cell Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top