esakal | अकोला जिल्ह्यातील १२.४५ लाख लाभार्थ्यांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य!
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला जिल्ह्यातील १२.४५ लाख लाभार्थ्यांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य!

अकोला जिल्ह्यातील १२.४५ लाख लाभार्थ्यांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर कमी, अधिक प्रमाणात निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात गरीब जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १२ लाख ४५ हजार ७६४ लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाकडून ३ हजार ९७० मेट्रीक टन गहू तर २ हजार ६११ मेट्रीक टन तांदुळाचा साठा नुकताच मंजुर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना नोव्हेंबरपर्यंत मोफत गहू व तांदुळ वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Free foodgrains to 12.45 lakh beneficiaries in Akola district till November!)

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर गरीबांची रोजी गेली असली तर त्यांना रोटी मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीबांना मे व जून महिन्यांत मोफत धान्य वाटपाची योजना जाहीर केली होती. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील गरीबांसाठीच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची व्याप्ती जुलै ते नोव्हेंबरपर्यंत वाढविली होती. परंतु त्यासाठीचे धान्य जिल्ह्याला प्राप्त झाले नव्हते. दरम्यान नुकतेच जुलै ते नोव्हेंबरपर्यंत धान्य वाटप करण्यास शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी धान्य साठा सुद्धा मंजुर केला आहे. त्यामुळे अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; सात नवे पॉझिटिव्हअसे आहे शासनाने मंजुर केलेले धान्य
- गहू - ३ हजार ९१७ मेट्रीक टन (३९ हजार १७० क्विंटल)
- तांदुळ - २ हजार ६११ मेट्रीक टन (२६ हजार ११० क्विंटल)

असे मिळणार धान्य
- प्राधान्य व अंत्योदय गटातील प्रत्येक लाभार्थ्याला तीन किलो गहू व दोन किलो तांदुळ प्रती व्यक्ती मोफत मिळेल.
- जिल्ह्यात अंत्योदय गटात ११ लाख १६ हजार ७५३ लाभार्थी आहेत. त्यांना याचा लाभ होईल.
- प्राधान्य गटात १ लाख २९ हजार लाभार्थी आहेत. त्यांना सुद्धा मोफत धान्य मिळेल.

केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्यांना मोफतचे धान्य देण्यात येणार आहे. त्यासाठीचा धान्य साठा शासनाने नुकताच मंजुर केला आहे. प्राधान्य व अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल.
- बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

संपादन - विवेक मेतकर

Free foodgrains to 12.45 lakh beneficiaries in Akola district till November!

loading image