Gajanan Maharaj Palkhi : श्री गजानन महाराज शेगाव पालखी रविवारी अकोल्यात

विदर्भाची पंढरी म्हणून प्रख्यात शेगाव नगरी संत श्री गजानन महाराजांची पालखी आषाढीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणार
gajanan maharaj palkhi shegaon at akola on sunday pandharpur culture and religion
gajanan maharaj palkhi shegaon at akola on sunday pandharpur culture and religionsakal

अकोला : विदर्भाची पंढरी म्हणून प्रख्यात शेगाव नगरी संत श्री गजानन महाराजांची पालखी आषाढीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणार आहे. शेगाव येथून निघाल्यानंतर गायगाव, भौरवद मार्गे पालखीचे अकोल्यात रविवार, ता. २८ मे २०२३ रोजी सकाळी ७ वाजता आगमण होईल.

भजनी मंडळी, दिंडी, अश्व, हाथी आणि ७०० वारकऱ्यांसह आगमण होत असलेल्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी अकोलेकर सज्ज झाले आहे. श्री गजानन महाजार पालखी सत्कार समितीची सभेत स्वागताचे नियोजन करण्यात आले.

गत चार दशकापासून येथील श्री गजानन महाराज शेगाव पालखी सत्कार समितीच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत व श्रींचे भक्तांना शिस्तबद्धपणे दर्शन घडवून देण्याची किमया यशस्वीपणे पार पाडल्या जात आहे.

यंदाही श्रीच्या पालखीच्या स्वागताची ही परंपरा कायम ठेवून त्यामध्ये अधिक जोमाने व हर्षलोसाने भर पडावी म्हणून सोमवार, ता. २२ मे रोजी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेत सर्वानुमते श्रींच्या पालखीचे स्वागत व रात्रीचा मुक्काम मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी पालखीच्या दोन दिवसीय मुक्कामातील आपआपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा मानस व्यक्त केला आहे.

गतवर्षी आलेल्या पालखी उत्सव खर्चाचा आढावा समितीचे कोषाध्यक्ष नारायण भाला यांनी समितीच्या उपस्थितांसमोर मांडला. भाविक भक्तांना श्रींचे दर्शन व्हावे म्हणून अकोला शहराच्या मुख्य रस्त्याने श्रींचे पालखीचे शोभायात्रा काढण्याचे ठरवले आहे.

हरिभजनाचा लाभ व्हावा, समता बंधुभाव वाढवा यासाठी दुपारी ३ ते रात्री १२ पर्यंत मुंगीलाल बाजोरिया विद्यालय ग्राउंडवर श्रींच्या दर्शनाची व्यवस्था केली आहे. भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

gajanan maharaj palkhi shegaon at akola on sunday pandharpur culture and religion
Shirdi Palkhi : सिन्नर-शिर्डी मार्गावर साईभक्तांची मांदियाळी; ठिकठिकाणी भव्य स्वागत

या सभेला समितीचे अध्यक्ष शिवलाल बोर्डे, उपाध्यक्ष प्रकाश खंडेलवाल, उपसचिव दिनेश पांडव, शोभायात्रा प्रमुख सर्वश्री नारायणराव आवारे, बाबासाहेब गावंडे, केशवराव पाटील, अरविंद पाटील, सदस्य सर्वश्री रजनीकांत सप्रे, श्यामसुंदर मालपाणी,

जनार्दन बापू देशमुख, गजानन ढेमे, बंडू लाडेकर, भास्कर लांडे, गोविंद खंडेलवाल, दिलीप अग्रवाल, दामोदर साठे व प्रसिद्धी प्रमुख विजय रांदड हे उपस्थित होते. सभेचे संचालन सचिव किशोर फुलकर यांनी तर आभार प्रदर्शन उपसचिव रामराव घाटे यांनी केले.

वारी पंढरीची

  • दोन दिवस राहणार मुक्काम

  • अकोलेकर स्वागतासाठी सज्ज

  • पालखी सत्कार समितीच्या सभेत स्वागताचे नियोजन

gajanan maharaj palkhi shegaon at akola on sunday pandharpur culture and religion
Akola Riots : अकोला दंगलप्रकरणी मोठी अपडेट! मुख्य आरोपी अटकेत

पहिल्या दिवसीचा पालखी मार्ग

रविवार, ता. २८ मे रोजी अकोला शहरातील शोभायात्रेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता श्रींची पालखी शंकरलाल खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट, जुने शहर येथून निघेल.

डाबकी रोड वरील श्री गजानन महाराज मंदिरासमोरून श्रीवास्तव चौक, जय गुरुदेव पेट्रोल पंप, श्री विठ्ठल रुक्माई मंदिर, काळा मारुती मंदिर, सुशील बेकरी समोरून, लोखंडी पुलावरून, मोठा पुल, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड, महानगरपालिका चौक, चांदेकर भवन चौक (ओपन थेटर), निशांत टॉवर, चिव चिव बाजार प्रवेशद्वारातून, स्वावलंबी विद्यालय समोरून, मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात पालखीचा मुक्काम राहील.

gajanan maharaj palkhi shegaon at akola on sunday pandharpur culture and religion
Akola News : दंगलीसाठी जबाबदार दोन मुख्य आरोपींना अटक

दुसऱ्या दिवसीचा पालखी मार्ग

सोमवार, ता. २९ मे २०२३ रोजी सकाळी 6 वाजता सिंगी हॉस्पिटल जवळून, उड्डाण पुल खालून, जिल्हाधिकारी निवास समोरून, वनविभाग कार्यालय समोरून, धर्मदाय आयुक्त कार्यालय समोरून खंडेलवाल भवन मार्गे गौरक्षण रोड, जुने इन्कम टॅक्स चौक,

हॉटेल वैभव जवळून आदर्श कॉलनी शाळा नंबर १६ येथे दुपारी विश्रांती व महाप्रसादाचे वितरण होईल. त्यानंतर संभाजीनगर श्री गजानन महाराज मंदिर, बोबडे दूध डेयरी, सिंधी कॅम्प रोड, दक्षता नगर कॉम्प्लेक्स समोरून, जिल्हा कारागृह समोरून,

अशोक वाटिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सरकारी बगीच्या, खोलेश्वर मार्गे सिटी कोतवाली चौक, लोखंडी पुलावरून, जय हिंद चौक, राज राजेश्वर मंदिर समोरून, हरिहर पेठ मधील श्री शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद टाऊन स्कूल येथे रात्रीचा मुक्काम राहतील. त्यानंतर मंगळवार, ता. ३० मे रोजी पालखी वाडेगाव मार्गे पुढच्या प्रवासाला निघेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com