जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 December 2020

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याकरिता (ता.१) ऑगस्टपासून ऑनलाईन प्रणालीव्दारे पद्धती अवलंबण्यात आली आहे.

अकोला : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार अकोला जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारांना आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी करावयाचा अर्ज संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील, असे जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोलाचे उपायुक्त तथा सदस्य सचिव यांनी कळविले आहे.

हे ही वाचा : जिल्ह्यात ४८ कोरोना पॉझिटीव्ह तर एकाचा मृत्यू

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याकरिता (ता.१) ऑगस्टपासून ऑनलाईन प्रणालीव्दारे पद्धती अवलंबण्यात आली आहे. यापूर्वी निवडणुकीसाठी हस्तलिखित अर्ज स्विकारण्यात येत होते. मात्र, सद्यस्थितीत ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज स्विकारण्यात येत आहेत. तेव्हा उमेदवारांनी संकेतस्थळावर परिपूर्ण माहिती भरावी. त्याची मूळ प्रत जातपडताळणी समितीच्या कार्यालयात सादर करावी. उमेदवार विवाहित महिला असल्यास त्यांनी माहेरकडील पुरावे सादर करावे. उमेदवाराचे मूळ पुरावे ज्या जिल्ह्यातील असतील त्याच जिल्ह्यातील जातीचे प्रमाणपत्र त्या जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करावा, असे ही समिती मार्फत कळविण्यात आले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The general election program of 225 gram panchayats in Akola district has been announced