क्षणाची हौस बेतली जीवावर; २१ वर्षीय तरुणीचा तडफडून मृत्यू| Girl Death News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

क्षणाची हौस बेतली जीवावर; २१ वर्षीय तरुणीचा तडफडून मृत्यू

बाळापूर (जि. अकोला) : डी.एड.ची विद्यार्थिनी असलेल्या २१ वर्षीय तरुणीचा घरी झोका घेताना पाळण्याच्या दोरीचा गळफास लागून मृत्यू (girl death) झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी रिधोरा येथे घडली. या घटनेमुळे रिधोरा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. कल्याणी दीपक पोटे असे मृत तरुणीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, कल्याणी ही सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरातील पाळण्यावर बसून झोके घेत होती. तिची आई गच्चीवर कामात होती. वडील बाहेरगावी नोकरीवर गेले होते. त्यामुळे तिच्या जवळ कोणीही नव्हते. अशात ती एकटीच पाळण्यावर होती. पाळण्याच्या दोरीवर उशी टाकून ती बसलेली होती. अचानक उशी सरकल्याने ती कोसळून बेडच्या काठावर पडली व दोरी तिच्या गळ्याभोवती अडकली.

हेही वाचा: शाळांना पुन्हा टाळे; २० डिसेंबर ते ७ जानेवारी २०२२ पर्यंत सुटी जाहीर

तिच्या गळ्याला बेडचा जबर मार लागला. काही वेळ ती तशीच पडून होती. काही वेळानंतर आई वरून खाली आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीला पाहताच आईने किंचाळी फोडली. त्यामुळे नागरिकांनी कल्याणीला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात तातडीने हलविले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत (girl death) घोषित केले.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

कल्याणी ही कुटुंबासह सर्वांचीच आवडती होती. तिचे पार्थिव आणल्यानंतर सर्वच हळहळले. लेकीच्या मृत्यूने आई-वडिलांवर आभाळ कोसळले असून त्या दोघांचीही प्रकृती बिघडली. अत्यंत शोकाकुल वातावरणात मृत कल्याणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गाव हळहळे होते.

Web Title: Girl Death Ded Student Crime News Akola District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..