esakal | इस्टेट गावात पण, मुलगा हवा पुण्यात!
sakal

बोलून बातमी शोधा

इस्टेट गावात पण, मुलगा हवा पुण्यात!

इस्टेट गावात पण, मुलगा हवा पुण्यात!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन :मुलगा देखणा असावा, शासकीय नोकरदार हवा, शिकलेला असावा, सासू-सासरे जवळ नको, सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलगा शहरात राहणारा असावा. अशा, एक- ना अनेक अपेक्षा घेऊन बसलेल्या मुलींच्या पालकांमुळे अनेक मुलांची लग्न जुळत नसल्याने ते लांबणीवर पडत असल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान समाजात मुलींची संख्याही कमी असल्याने अनेकांची लग्न जुळेनाशी झाली आहेत.

प्रत्येक आई-वडिलांना आपली मुलगी सुखी घरी नांदावी ती, आनंदी राहावी अशी अपेक्षा असते. यात नोकरी असलेल्या मुलांना अधिक पसंती दिली जात आहे. मात्र, गरीब असो वा श्रीमंत शेतकरी मुलाला मुलगी देण्यास मुलीचे आई-वडील राजी होत नाहीत. कोरोनाच्या संकटामुळे अनेक तरुण मोठ्या शहरातून गावात आले. कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बरेच तरुण गावातच रमले. सद्यस्थितीत उपवर मुलींची संख्या कमी असल्याने तरुणांचे लग्न जुळणे कठीण झाले आहे. परिणामी उपवर मुलांच्या वडिलांची फारच दमछाक होत असल्याची स्थिती समोर येत आहे. एकीकडे कोरोना, दुष्काळ, अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता चांगल्या घरातील मुलीही संकटात टाकत आहेत. शेती करणाऱ्या मुलाला मुलगी देण्यास ९० टक्के पालक होकार देत नसल्याचे दिसते.

एकत्रित कुटुंबाला मुलींकडून नकार

पूर्वी एकत्रित कुटुंबाला सर्वाधिक मुली पसंती देत होत्या. मात्र, अलीकडच्या काळात शिकल्या सवरलेल्या मुलींना आता संयुक्त कुटुंब पद्धत नकोशी झाली आहे. नवरा कामाला, मुलगी कामाला पैसे कमवायचे एन्जॉय करीत जीवन जगायच अस, ऐवढच जीवन मुलींचे झाले आहे. त्यामुळे अनेक मुलींना सासू-सासरे ही जवळ नको, मूलबाळ लवकर नको अशी, मागणी आपल्या पतीसमोर करतानाही दिसतात.

मुलींच्या अपेक्षा भरपूर

मुलीला शासकीय नोकरदार, मेट्रो सिटीत राहणारा नवरा हवा आहे. एकत्र कुटुंब नको, सासू-सासरे जवळ नकोत, मुलगी बीई असेल तर मुलगा एमई हवा आहे. शेतकरी मुलाला ९० टक्के मुली नकार देत आहेत. व्यसनाधीन मुलगा असल्यानेही अनेक मुली पसंत करीत नाहीत. पुणे, मुंबईत राहणारा असेल तर, लवकरच पसंती मिळते. दिसायला सुंदर व ऐकणारा असायला हवा, अशा विविध अपेक्षा मुलींच्या असल्याचे दिसून येत आहे.

loading image
go to top