

International Book of Records Recognises Atharva’s Sketch of Shivaji Maharaj
Sakal
-शाहिद कुरेशी
मोताळा: येथील अथर्व सुनील खर्चे या युवकाने कागदाच्या ४८० तुकड्यांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य रेखाचित्र साकारून शिवरायांना अनोखी मानवंदना दिली होती. शिवरायांच्या या रेखाचित्राचा जागतिक पातळीवर सन्मान झाला असून, अथर्वच्या कलाकृतीची ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे.