सोने घेण्यासाठी बोलविले अन् लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold Robbed

वाशीम : सोने घेण्यासाठी बोलविले अन् लुटले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : अर्धा किलो सोने कमी किमतीत देतो अशी थाप मारून सोने घेण्यासाठी गेलेल्या दोघांना पाच लाख रुपयांनी लुटल्याची घटना रिसोड येथे बुधवारी (ता.१०) घडली. यातील तीन आरोपींचा पोलिसांनी २४ तासात छडा लावला.

१० नोव्हेंबर रोजी फिर्यादी अभिजित गणेश धनबर यांनी पो.स्टे. रिसोड येथे रिपोर्ट दिला की, त्याचा मित्र गौरव देशमुख याचे मो.नं. वरून कॉल आला व सांगितले की माझे जवळ अर्धा किलो सोने आहे, ते तुम्हाला पाच लाख रुपयांमध्ये देतो. असे म्हणून फिर्यादी व साक्षीदार गौरव देशमुख यांना तीन अनोळखी व्यक्तींनी काठीने मारहाण करून त्यांचे जवळील पाच लाख रुपये असलेली पिशवी हिसकावली. याबाबत रिसोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: नाशिक : बारावी परीक्षेसाठी आजपासून भरता येणार अर्ज

पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक जाधव यांनी सदर गुन्ह्याचे तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आदेश देऊन रवाना केले. सुनील मनोहर भोसले (वय ३८), संजय बबन भोसले (वय २३), राजू मनोहर भोसले (वय २९) सर्व रा. मोठेगाव, ता. रिसोड, जि. वाशीम यांना ग्राम अंत्री देशमुख, ता. मेहकरस जि. बुलढाणा येथून गुन्ह्यात चोरीस गेलेले नगदी ४ लाख ४७ हजार ५०० रुपये व एक मोटारसायकल किंमत ५० हजार रुपये असा मुद्देमाल ताब्यात घेतला. चौकशीअंती आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

loading image
go to top