Akola News : गोर बंजारा आरक्षणाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडावा; दीड हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचे ठराव मुख्यमंत्री, राज्यपालांना पाठवणार

गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न प्रभावीपणे मांडावा, अशी मागणी गोर बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
Gor Banjara society Reservation Issue

Gor Banjara society Reservation Issue

sakal

Updated on: 

अकोला - गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न प्रभावीपणे मांडावा, अशी मागणी गोर बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाचा शासनाकडे पाठपुरावा करावा, यासाठी खासदार आणि आमदारांना निवेदन देण्यात येणार आहे. मागणीची दखल न घेतल्यास लोकप्रतिनिधींच्या घरांना घेराव घालण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे. गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेशभाऊ चव्हाण यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com