esakal | सरकारने नागरिकांना भयभित करण्याचे काम केले- ॲड. प्रकाश आंबेडकर 
sakal

बोलून बातमी शोधा

The government acted to intimidate the citizens- Adv. Prakash Ambedkar akola marathi news

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यामागे नागरिकांना भयभित करण्याचा उद्देश होता. आपले मोठेपण जपण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोना आणला आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या इशाऱ्यावर सर्व काम सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत केला.

सरकारने नागरिकांना भयभित करण्याचे काम केले- ॲड. प्रकाश आंबेडकर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यामागे नागरिकांना भयभित करण्याचा उद्देश होता. आपले मोठेपण जपण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोना आणला आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या इशाऱ्यावर सर्व काम सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत केला.


अकोल्यासह राज्यात व देशात कोरोनाचा कहर वाढतच आहे. ही संख्या ३० जूनपर्यंत पाच लाखांवर जाईल. कमी रुग्ण असताना लॉकडाउन व संख्या वाढल्यानंतर लॉकडाउन संपवला जाईल. यामागे आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिलेल्या ३० जूनची मुदत असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे. देशात ६ हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. मुळात त्यांचा कोरोनाने मृत्यू झालाच नाही. त्यांच्या मृत्यूची कारणे वेगवेगळी आहे. मोठ्या प्रमाणावर अस्थमा असलेल्या रुग्णांचा मृतकांमध्ये समावेश आहे. मात्र त्यासाठी देशातील १५ कोटी स्थलांतरीत मजुरांचे हाल केले. त्यावर कुणीही बोलण्यास तयार नाही.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यापूर्वी चिगणगुनिया, स्वाईनफ्लू सारखे आजार आले. त्यांनी गावेच्या गावे बांधित झाली होती. त्यावेळी लॉकडाउन करण्याची वेळ आली नाही. तत्कालीन सरकारने लोकांना धिर देण्याचे काम केले. आताचे सरकार लोकांना भयभित करण्याचे काम करीत असल्याचा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला. या पत्रकार परिषदेला या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, डॉ. प्रसन्नजीत गवई, प्रमोद देंडवे आदींची उपस्थिती होती.

पंतप्रधानांमुळेच देशात कोरोना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळेच देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. योग्यवेळी प्रदेशी पाहुण्यांना देशात बंदी केली असती आणि येणाऱ्यांचे स्वॅब चाचणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असते तर कोरोनाचा कहर रोखता आला असता. मात्र पतंप्रधानांनी तसे होऊ दिले नसल्याचा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला.

सीमेवरील भांडणं नौटंकी
भारत-चीन सीमेवरील भांडण हे नौटंकी आहे. नरेंद्र मोदींना भारतात तर चीनच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या देशात मोठेपण सिद्ध करावयाचे आहे. त्यासाठी देशातील बिकट आर्थिक परिस्थितीकडून नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरिता सीमेवरील भांडणांची नौटंकी केली जात असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.