
अकोला : लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, काही अपात्र लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाने या संदर्भात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, अपात्र लाभार्थ्यांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी एक विशेष मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.