esakal | धान्य गोदाम फोडणारी टोळी अकोला पोलिसांच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

2abc844b-2fef-406e-bbba-9f638ff2f335.jpg

तूर, हरभरा, सोयाबीन चोरीचा छडा, 12 जणांना अटक

धान्य गोदाम फोडणारी टोळी अकोला पोलिसांच्या जाळ्यात

sakal_logo
By
भगवान वानखेडे

अकोला  ः   जिल्हयात मार्च महिन्यापासून धान्य गोदाम फोडून तूर, सोयाबीन, हरभरा चोरीच्या घटना वाढल्या होत्या.  सुमारे  11  लाख 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे प्रकरण पोलिसात दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास करीत स्थानिक गुन्हे शाखेने बुलडाणा जिल्ह्यातील एक मोठी टोळी जेरबंद केली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी, जिल्ह्यात शेतातील गोदामांमधील धान्यसाठा चोरून नेण्याच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.  या प्रकरणाचा एकत्रित तपास स्थानिक गुन्हे शाखेने हातात घेत तपास सुरु केला. यात बुलडाणा जिल्हयातील 12 जणांची टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले. सोमवारी (ता. 13) पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. काही दिवसांपुर्वी जिल्हयातील  बोरगांवमंजू पोलिस  ठाण्याच्या हद्दीत एका धान्य गोदामातुन 115 क्विंटल तूर, 127 क्विंटल हरभरा, 22 क्विंटल सोयाबीनसह अन्य मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली. या गुन्हयात वापरण्यात आलेले दोन पीकअप वाहने जप्त करण्यात आली आहेत.  चोरीला गेलेला बहुतांश मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  या टोळीपासून  इतर ठिकाणच्याही सहा गुन्हयांची प्रकरणे समोर आली आहेत.  आणखी काही गुन्हयांची उकल होण्याची शक्यता आहे.  ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ, पोलिस उपनिरीक्षक तुषार नेवारे, सागर हटवार, दत्तात्रय ढोरे, संदीप काटकर,  शक्ति कांबळे, किशोर सोनोने, मनोज नागमते, संदीप  ताले, गीताबाई अवचार यांच्यासह आदींनी केली.धान्याची परस्पर विक्री केली मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी धान्य काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून खुल्या बाजारात विक्री करण्याचा सपाटा लावला होता.  या अनुषंगाने अकोला पोलिसांच्या एका पथकाने सोमवारी वरवट बकाल (ता. संग्रामपूर) येथे काही जणांच्या व्यवहाराची चौकशी केली . तेव्हाच हे प्रकरण मोठे असल्याची चर्चा सुरु झाली.

या 12 चोरांना केले जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेने विठ्ठल पंजाबराव मेहेंगे, विश्वनाथ चौके, पंजाबराव बघे, नीलेश प्रकाश बघे, आकाश बिलेवार, श्याम भीमराव सरीसे, श्रीधर पठाण, निवृत्ती घटे, गजानन कोठारे,  ज्ञानदेव बघे, श्रीकृष्ण करांगळे या 12 आरोपीना अटक करण्यात आली आहे. 

टोळीचे हेच एक काम
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धान्य चोरणाऱ्या या टोळीतील अनेकांवर अशाच प्रकारचे गुन्हे अमरावती परीक्षेत्रातील इतर जिल्ह्यातही दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेकडे धान्य चोरीचा तपास आल्यानंतर पोलिसांनी एक पथक गठीत करून या टोळीचा शोध घेत चोराना अटक केली आहे.