ग्रामगीता प्रचारक डॉ. उद्धवराव गाडेकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Uddhavrao Gadekar

ग्रामगीतेचे प्रचारक, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.उद्धवराव गाडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते.

ग्रामगीता प्रचारक डॉ. उद्धवराव गाडेकर यांचे निधन

अकोट - ग्रामगीतेचे प्रचारक, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.उद्धवराव गाडेकर (Dr. Uddhavrao Gadekar) यांचे दीर्घ आजाराने निधन (Death) झाले. ते ५८ वर्षांचे होते. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेच्या प्रचार आणि प्रसारासाठी हजारो कीर्तन करीत तुकडोजी महाराजांचे विचार घरा-घरांत पोहचवण्यासाठी ते आयुष्यभर झटले.

डॉ. उद्धवराव गाडेकर दादा यांचे बुधवारी (ता. ११) सकाळी ९ वाजता दीर्घ आजारानं निधन झाले. अकोला जिल्ह्यातील पाटसुळ येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या आश्रमात त्यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन ट्युमर आजाराने ग्रासले होते. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी सुरुवातीला चांगला प्रतिसादही दिला. मात्र बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

गेले २५ वर्षांपासून डॉ. उद्धवराव गाडेकर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली पाटसुळ आश्रम येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या आश्रमात लहान मुलांवर ता. १ मे ते ३० जून दरम्यान सुसंस्कार वर्ग देखील चालवले जात होते. मुलांमध्ये संस्काराची जडण घडण केली जात होती. डॉ.उध्दवराव गाडेकर यांच्या निधनामुळे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलं, सूना, नातवंडं,भाऊ असा मोठा परीवार आहे. बुधवारी सायंकाळी गणमान्य व्यक्तींसह हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर पाटसूळ येथील आश्रमात अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. उद्धवराव गाडेकर महाराज हे राष्ट्रसंतांच्या विचारांचे खरे प्रसारक होते. कीर्तनाच्या माध्यमान जनजागृती करीत होते. तरुणांना मार्गदर्शन करण्याची एक अभूतपूर्व शक्ती त्यांच्यात होती. ४०० ते ५०० युवकांचे शिबिर ते दरवर्षी घेत होते. या शिबिरात दहा ते बारा वेळा जाण्याची संधी मला मिळाली. आमच्या वझ्झर येथील संस्थेत सुद्धा ते येत होते. त्यांच्या जाण्याने समाजाची फार मोठी हानी झाली आहे. मी आमच्या १२३ बेवारस मुलांच्या वतीने तसेच संस्थेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.

- डॉ. शंकरबाबा पापळकर, संचालक, स्व. अंबादासपंत वैद्य बालगृह, वझ्झर

Web Title: Gramgita Pracharak Dr Uddhavrao Gadekar Passed Away

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akoladeath
go to top