esakal | आर्सेनिक अलब्म ३० गोळ्यांबाबत ग्रामसेवक संभ्रमात

बोलून बातमी शोधा

आर्सेनिक अलब्म ३० गोळ्यांबाबत ग्रामसेवक संभ्रमात
आर्सेनिक अलब्म ३० गोळ्यांबाबत ग्रामसेवक संभ्रमात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंजर (जि.अकोला) ः सध्या कोरोना महामारीचा प्रकोप ग्रामीण भागात वाढता आहे. ही महामारी रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने आर्सेनिक अलब्म ३० गोळ्यांचे वाटप केले आहे. याबाबत स्पष्ट निर्देश न देण्यात आल्याने बार्शीटाकळी तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवक संभ्रमात पडले आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्व गावातील लोकांना ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आर्सेनिक अलब्म ३० या गोळ्यांचे वाटप करण्याचे एका पत्राद्वारे सांगितले. मात्र पत्रामध्ये त्या गोळ्यांचा लॉट नंबर किती? बॅच नंबर किती? उत्पादन तारीख, आणि एक्सपायरी डेटचा अजिबात उल्लेख नाही. त्यामुळे ग्रामसेवकांना काही समजेनासे झाले आहे. आर्सेनिक अलब्म ३० या गोळ्या गेल्या वर्षी सर्वसामान्यांना डॉक्टरांनी वाटल्यात. अनेक दांशुरांनी घरोघरी जाऊन वाटप केल्यात. अकोला जिल्हा परिषद असो की, जिल्हा आरोग्य विभाग असो, त्यांना एवढ्या उशिरा जाग कसा आला, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
................
शासनाचे निर्देशामुळे आर्सेनिक अलब्म ३० या गोळ्या आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीने गावातील ग्रामसेवका मार्फत वाटायला सांगितल्या आहेत. सदर आदेशित केलेल्या पत्रावर बॅच नंबर, लॉट नंबर, उत्पादन तारीख, एक्सपायरी डेट आहे किंवा नाही, हे मला माहित नाही.
- डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. अकोला.
.................
बॅच नंबर, लॉट नंबर, उत्पादन तारीख, आणि एक्सपायरी डेटचा उल्लेख आदेशित केलेल्या पत्रावर का नाही? याची माहिती वरिष्ठांकडून घेऊन सांगतो. मात्र या सर्व गोष्टी गोळ्यावर मात्र स्पष्ट पणे लिहिलेल्या आहेत आणि आर्सेनिक अलब्म ३० या गोळ्या शासनाच्या निर्देशानुसार वाटप करीत आहो. केंद्रशासनाच्या आयुष विभाग दिल्ली, यांनी राज्य शासनाला आदेशित केल्यानंतर जि. प. मार्फत याचे वाटप होत आहे. शिवाय आर्सेनिक अलब्म ३० या कंपनीचे ई-टेंडरिंग सुद्धा झाले आहे. सर्व काही व्यवस्थित आहे,
- आर. एस. मुंढे, औषधी विभाग, जि. प. अकोला