

Spiritual Fervour Grips Hiwara Ashram on Swami Vivekananda Jayanti
Sakal
-संतोष थोरहाते
हिवरा आश्रम : युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद, कर्मयोगी प. पू. शुकदास महाराज यांच्या नामघोषाने हिवरा आश्रम नगरी आज ८ जानेवारी रोजी दुमदुमून गेली. निमित्त होते विवेकानंद जन्मोत्सवा निमित्त निघालेली भव्य शोभायात्रेचे स्वामी विवेकानंद व शुकदास महाराज यांच्या रथारूढ मूर्तींचे आसोबा संस्थानेच आसाराम भारती महाराज, आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, विश्वस्त प्रशांत हजारी यांच्या हस्ते पूजनाने या शोभायात्रेला सुरुवात झाली.