Akola Wari 2025 : श्री गजानन महाराज पंढरपूर वारीच्या ५६व्या पालखी सोहळ्याचे अकोल्यात भव्य स्वागत झाले. लाखो भाविकांनी दर्शन घेतले. ‘गण गण गणात बोते’ च्या जयघोषाने अकोल्याचे वातावरण भक्तिमय झाले.
अकोला : ‘जय गजानन श्री गजानन’, ‘गण गण गणात बोते’, अशा जयघोषांनी सलग दोन दिवस श्री राज राजेश्वर नगरी दुमदुमून निघाली. शेगावीच्या राणाच्या दर्शनाची ओढ लाखो ‘श्री’ भक्तांना श्री गजानन महाराज शेगाव पायदळ वारीच्या ५६ व्या पालखी सोहळ्याकडे घेऊन गेली.