
अकोला : नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर रविवारी (ता.१०) अजनीहून (नागपूर) या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारी ही सेवा सुरू झाल्याने, विशेषतः पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विदर्भातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.