esakal | सौर ऊर्जा यंत्रणेसाठी घरगुती ग्राहकांना अनुदान
sakal

बोलून बातमी शोधा

akola

सौर ऊर्जा यंत्रणेसाठी घरगुती ग्राहकांना अनुदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्थाव निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेणार आहे.

या योजनेसंदर्भात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी काल आढावा घेतला आणि घरगुती ग्राहकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी कार्यवाही करावी असे निर्देश दिले. केंद्राच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘रुफटॉप सौर योजना’ टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे.

घरगुती ग्राहकांसाठी एक ते तीन किलोवॉटपर्यंत ४० टक्के आणि तीन किलोवॉटपेक्षा अधिक ते दहा किलोवॉटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॉटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी दहा किलोवॉट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.

loading image
go to top