esakal | शिक्षकांच्या मृत्यूनंतर मिळणार सानुग्रह अनुदान
sakal

बोलून बातमी शोधा

 बंदर व गोदी कामगारांना मिळणार आगाऊ बोनस

शिक्षकांच्या मृत्यूनंतर मिळणार सानुग्रह अनुदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- अंशदायी पेन्शन योजनेतील शिक्षकांना दिलासा

अकोला ः अंशदायी पेंशन योजनेतील (Contributory pension scheme) शिक्षकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान लवकरच मिळेल. याबाबतचा आदेश शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाला दिला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदने (प्राथमिक विभाग) सातत्याने पाठपुरावा केला हाेता. (Grants will be given after the death of the teacher)

अंशदायी पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना द्यायचे १० लाख रुपये सानुग्रह अनुदान आणि लाभ यासाठी शिक्षकांमधून मागणी करण्यात येत हाेती. यासंबंधी शिक्षक परिषदचे राज्याचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी शिक्षण संचालकांनी पत्र देऊन पाठपुरावाही केला होता.

हेही वाचा: सावधान; ‘हॅप्पी हायपोक्सिया’ ठरतोय सायलेंट किलर!

त्याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्ह्यातील सर्व प्रकरणांची चौकशी करून सर्व अहवाल ग्रामविकास विभागाकडे तातडीने पाठविण्याचा आदेश संचालकांनी दिला आहे. तसेच शासनाच्या निर्देशानुसार सानुग्रह अनुदान देऊन तसा अहवाल सादर करण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदर या निर्णयाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, वंदना बोर्डे, गजानन काळे, श्याम कुलट व इतरांनी स्वागत केले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Grants will be given after the death of the teacher