चित्रपटगृह, नाट्यगृहांना हिरवा कंदील! जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

२२ ऑक्टाेबरपासून अटी-शर्तींसह सुरु करण्यास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी परवानगी दिली
चित्रपटगृह, नाट्यगृहांना हिरवा कंदील! जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी
चित्रपटगृह, नाट्यगृहांना हिरवा कंदील! जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीsakal
Updated on

अकोला : कोरोना बाधितांची रुग्णसंख्या कमी होत असल्याने जिल्ह्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह, सांस्कृतिक कार्यक्रम, मनाेरंजन केंद्र २२ ऑक्टाेबरपासून अटी-शर्तींसह सुरु करण्यास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी परवानगी दिली आहे. एकूण जागेच्या ५० टक्के क्षमतेने या ठिकाणी कार्यक्रम घेता येणार असून, काेराेना प्रतिबंधक लसीचे दाेन्ही डाेस घेतलेल्या व्यक्तीलाच प्रवेश मिळणार आहे.

कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत संसर्गाची गती वाढल्यामुळे राज्य शासनाने चित्रपट गृहांसह मनोरंजन केंद्रांवर निर्बंध लावले होते. त्यामुळे चित्रपट गृह, नाट्यगृह, सांस्कृतिक कार्यक्रम, मनाेरंज केंद्र बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान आता जिल्ह्यात काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी हाेत आहे. त्यामुळे निर्बंधही प्रचंड प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे ११ ऑक्टाेबर राेजी शासनाने चित्रपटगृह, सांस्कृतिक, मनाेरंजन कार्यक्रमांना परवानगी दिली. त्यानुसार १८ ऑक्टाेबर राेजी जिल्हाधिकाऱ्यांनीही आदेश जारी केला.

चित्रपटगृह, नाट्यगृहांना हिरवा कंदील! जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी
विमानतळ निर्बंधाबाबत भीती बाळगू नये; देसाईंचं नागरिकांना आवाहन

या आहेत अटी-शर्ती

- सामाजिक अंतर नियमाचे पालन करावे लागणार आहे.

- पूर्ण वेळ व्यवस्थित मुखपट्टी (मास्क) परिधान करावी लागेल.

- शिकंताना, खाेकलतांना रूमाल, टिशू पेपरचा वापर करावा.

- काेराेना प्रतिबंधक लसीचा दुसरा डाेस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या प्रेक्षकासच प्रदेश मिळणार आहे.

- चित्रपटगृहात पेय- खाद्य पदार्थ सेवनाला परवानगी राहणार नाही. मात्र बाहेर परवानगी राहणार आहे.

- संपूर्ण परिसराचे राेज निर्जुंतुकीकरण करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com