विमानतळ निर्बंधाबाबत भीती बाळगू नये; देसाईंचं नागरिकांना आवाहन

कऱ्हाड विमानतळाच्या विस्तारवाढीसाठी शासनाकडुन अनेक वर्षापासुन प्रयत्न सुरु
विमानतळ निर्बंधाबाबत भीती बाळगू नये; देसाईंचं नागरिकांना आवाहन
विमानतळ निर्बंधाबाबत भीती बाळगू नये; देसाईंचं नागरिकांना आवाहनsakal
Updated on: 

कऱ्हाड : विमानतळाच्या निर्बंधाबाबत विनाकारण भिती बाळगु नये. प्रत्येक विमानतळाच्या परिसरात काही निर्बंध असतातच. त्यानुसार कऱ्हाड विमानतळाच्या विकासासाठी हे निर्बंध लावण्यात आले आहेत, अशी माहिती येथील विमानतळाचे व्यवस्थापक कृणाल देसाई यांनी दिली.

कऱ्हाड विमानतळाच्या विस्तारवाढीसाठी शासनाकडुन अनेक वर्षापासुन प्रयत्न सुरु असुन त्यासाठीची कार्यवाही प्रशासनाकडुन सुरु आहे. मात्र अजुनही विस्तारवाढ झालेली नाही. दरम्यान विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिपक कपुर यांनी कऱ्हाड विमानतळासाठी नियमावली बनवली आहे. त्यामध्ये काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांना त्यांनी पत्राव्दारे कळवले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी सिंह यांनी संबंधित पत्राच्या अनुशंघाने विमानतळाच्या वीस किलोमीटरच्या परीघात उंचीच्या अनुशंघाने बांधकाम उभारणी, झाडे लावणे यासाठी विमानतळ विकास कंपनी आणि संबंधित विभागाचा ना-हरकत दाखला घेण्याचे निर्देश दिले आहेत.

विमानतळ निर्बंधाबाबत भीती बाळगू नये; देसाईंचं नागरिकांना आवाहन
कऱ्हाडातही कॉंग्रेसला सत्ता द्या; पृथ्वीराज चव्हाणांचं आवाहन

त्यासाठीची कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पत्राव्दारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक, कऱ्हाड प्रातांधिकारी, तहसीलदार, जिल्हा प्रशासन अधिकारी, गटविकास अधिकारी कऱ्हाड व मलकापुर पालिकेचे मुख्याधिकारी यांना त्याबाबतचे आदेश दिले आहेत.

त्याविरोधात येथील बांधकाम व्यावसायीक, क्रीडाई संघटना यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेवुन ती अट्ट रद्द करण्याची मागणी केली. विमानतळ विस्तारवाढ विरोधी समितीनेही त्याला विरोध केला आहे. त्यापार्श्वभुमीवर विचारले असता विमानतळ व्यवस्थापक देसाई म्हणाले, प्रत्येक विमानतळाचा दर्जा आणि त्याची कार्यवाही वेगवेगळी असते. प्रत्येक विमानतळास काही निर्बंध असतातच. कऱ्हाड विमानतळासाठी काही निर्बंध लागु करण्यात आले आहेत. मात्र त्याच्या निर्बंधाबाबत नागरीकांना विनाकारण भिती बाळगु नये, असे आवाहनही त्यानी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nhalewadi Leopard Attack Two Year Old Dies in Satara Citizens Demand Action Against Forest Officials Over Safety Lapses in Area
Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
Satara Leopard Attack Child Dies in Nhalewadi After Leopard Drags 26 Month Old Boy Away Villagers Demand Action
Sugar Mill Opening
Marathi News Esakal
www.esakal.com