esakal | पालकमंत्री बच्चू कडू आज अकोल्यात

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री बच्चू कडू आज अकोल्यात
पालकमंत्री बच्चू कडू आज अकोल्यात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू गुरुवारी (ता. २२) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. निर्धारित दौऱ्या अंतर्गत त्यांचे दुपारी १२.१५ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल.

दुपारी १.१० वाजता ते एमआयडीसी येथे एमआयडीसी येथे आढावा सभा घेतील. दुपारी २.१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचून नियोजन भवनात कोरोना स्थितीचा आढावा घेतील.

त्यानंतर २.५० वाजता पाणंद रस्ते विकास योजना-आराखडा तयार करणे व नियोजन, दुपारी ३.३५ वाजता दिव्यांग गृह व गाडगेबाबा घर-प्रस्तावित जागा आढावा सभा, दुपारी ४.०५ वाजता जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला व शहीद स्मारक संदर्भात सादरीकरण, दुपारी ४.३५ वाजता कोविड-१९ संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे भेट व सायंकाळी ५वा. शासकीय विश्रामगृह अकोला येथे आगमन व राखीव. त्यानंतर ते सवडीने अमरावती कडे प्रयाण करतील.

संपादन - विवेक मेतकर