esakal | गरबा, दांडिया खेळता येणार की नाही? नवरात्रीसाठी मार्गदर्शक सूचना जारी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

गरबा, दांडिया खेळता येणार की नाही? नवरात्रीसाठी मार्गदर्शक सूचना जारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी (navratri celebration 2021) गृह विभागाने मंगळवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात गर्दी टाळण्यासाठी काही उपाययोजना सूचविल्या असून, गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी पोलिस, मनपा, जिल्हा परिषद, महसूल व नगर परिषद प्रशासनाला दिला आहे.

हेही वाचा: यावर्षी नवरात्र आठच दिवसांचे : पंचांगकर्ते मोहन दाते

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. गेले महिन्याभरात बोटावर मोजण्याइतके रुग्ण आढळले आहेत. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून शासन व प्रशासनाकडून सावध पावले उचली जात आहेत. येणारा काळ हा उत्सवांचा काळ आहे. त्यानिमित्ताने होणाऱ्या गर्दीतून पुन्हा संसर्ग वाढू नये म्हणून नवरात्रोत्सवातही प्रतिबंध कायम ठेवण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खरबदारी घेत गृह विभागाने परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक, सीईओ, मनपा आयुक्त, सर्व एसडीओ, तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा आदेश दिला आहे. कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षीही नवरात्रोत्सवादरम्यान गरबा, दांडियाला ‘ब्रेक’ राहणार आहे.

अशा आहेत सूचना!

  • सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी महापालिका, स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक.

  • कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेत मंडप उभाण्यात यावेत.

  • नवरात्रोत्सव साध्या करण्याच्या अनुषंगाने मूर्तीची सजावट करावी लागणार आहे.

  • गतवर्षी प्रमाणे यंदाही शक्यतो देवीची मूर्ती घरातील धातू, संगमवर मूर्तीचे पूजन करावे.

  • मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.

  • विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करायचे असल्यास प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था -

नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन व स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून दिली जाईल. या शिवाय संकेतस्थळ, फेसबुक आदी माध्यमांचा वापरही दर्शनासाठी करता येणार आहे.

रावण दहनाला गर्दी नको; मिरवणुकीलाही मनाई

रावणदहनाच्या दिवशी प्रेक्षकांना बोलावता येणार नाही. रावणदहनाचे ऑनलाईन प्रक्षेपण करू शकता. नवरात्रोत्सव मंडळ प्रतिबंधित क्षेत्रात असल्यास मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई राहणार आहे. देवी आगमन व विसर्जन मिरवणूक काढता येणार आहे. आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, ध्वनी प्रदुषणाबाबतच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

loading image
go to top