थर्टीफस्टच्या आनंदावर विरजण! फटाक्यांची आतषबाजी, मद्य विक्री, हाॅटेल्सला वेळेचे बंधन लागू

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 31 December 2020

संचारबंदीतच वर्षाला निराेप आणि नूतन वर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. त्यामुळे थर्टीफस्टच्या आनंदावर विरजण पडले आहे. रात्री मद्य विक्री व हाॅटेल्स सुरू राहणार असली तरी लगेच संचारबंदी लागू हाेणार आहे. फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी असून, धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन करता येणार नाही.

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतच वर्षाला निराेप आणि नूतन वर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. त्यामुळे थर्टीफस्टच्या आनंदावर विरजण पडले आहे. रात्री मद्य विक्री व हाॅटेल्स सुरू राहणार असली तरी लगेच संचारबंदी लागू हाेणार आहे. फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी असून, धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन करता येणार नाही.

सरत्या वर्षाला निराेप देण्यासाठी आणि नूतन वर्षाच्या स्वागताकरिता दरवर्षी जल्लाेष करण्यात येताे. रात्री अनेक ठिकाणी मनाेरंजनाचे कार्यक्रम हाेतात. हाॅटेल्स, बारमध्ये प्रचंड गर्दी असते. नूतन वर्षानिमित्त सकाळी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन हाेते. मात्र यंदा काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सण-उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत.

हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी

अशातच ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने सरकारी यंत्रणांची काळजी वाढली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे ३१ डिसेंबर राेजी वर्षाला निराेप देण्यासाठीच्या जल्लाेषावर मर्यादा येणार असून, संचारबंदी सुरू हाेण्यापूर्वी अर्थात ११ पूर्वीच आटाेपते घ्यावे लागणार आहे.

हे राहणार सुरू
- शासकीय तसेच खासगी रुग्णवाहिकांची सेवा, रात्रीच्या वेळेस सुरू राहणारी औषधांची दुकाने, पेट्रोलपंप, भाजीपाला विक्री, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी, रेल्वेने तसेच एस.टी बस व खासगी वाहनाने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता ऑटोरिक्षा यांना संचारबंदीच्या कालावधीत मुभा राहणार आहे.

हेही वाचा -अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

असे करा नवीन वर्षाचे स्वागत
गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नागरिकांनी घररीत नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. बागेत, रस्ते, अशा सार्वजनिक ठिकाणी माेठ्या संख्येने गर्दी न करता अंतर नियमाचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. वय वर्षे ६० पेक्षा जास्त असलेले नागरिक आणि १० वर्षांखालील मुलांनी घराबाहेर पडणे टाळावे. नववर्षाच्या स्वागतासाठी मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. धार्मिक स्थळांवर गर्दी करू नये. ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Happy Akola News New Year Celebration Thirtyfirst! Fireworks, sale of liquor, time constraints on hotels