दारू ढोसून शाळेत आढळलेले गुरुजी निलंबित

मद्यप्राशन करून शाळेत अध्यापन करणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले.
ZP School giroli budruk
ZP School giroli budruksakal
Updated on
Summary

मद्यप्राशन करून शाळेत अध्यापन करणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले.

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) - मद्यप्राशन (Alcohol) करून शाळेत (School) अध्यापन करणे एका शिक्षकाला (Teacher) चांगलेच महागात पडले, पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरोली बुद्रुक येथील सायकल अध्यापक सत्यवान हरदास यांना पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी एका आदेशाने निलंबित (Suspend) केले.

तालुक्यातील गिरोली बुद्रुक जिल्हा परिषदेच्या शाळेवर ५ मार्च २०२२ रोजी गटशिक्षण अधिकारी देऊळगाव राजा यांनी भेट दिली असता शाळेतील सहाय्यक शिक्षक सत्यवान शंकरराव हरदास मद्यप्राशन करून शाळेत आल्याचे आढळले दरम्यान सदर शिक्षकाची वैद्यकीय तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र जवळखेड येथे त्याच दिवशी करण्यात आली दरम्यान ९ मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जवळखेड यांच्याकडून गटविकास अधिकारी यांना वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला.

ZP School giroli budruk
बापाने आपल्या एक वर्षाच्या मुलीला जिवंत पुरले

सदर वैद्यकीय अहवालात सत्यवान हरदास हे सहाय्यक शिक्षक मद्यप्राशन केले होते असे नमूद करण्यात आले असल्याने सदर शिक्षक हे शाळेत मद्यप्राशन करून होते हे सिद्ध झाले या अहवालावरून गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी ११ मार्च रोजी सत्यवान शंकर हरदास यांना सचोटीचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर करणे व कर्तव्य पारायन नसणे या कारणासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा, सेवा (शिस्त व अपील)१९६४ चे भाग २ नियम ३ नुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून आदेशाचे दिनांकापासून निलंबित केले आहे, या कारवाईनंतर मद्यप्राशन करून शाळेत जाणाऱ्या शिक्षकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

जि. प. शाळेतील ते गुरुजी कोण

जिल्हा परिषदेच्या शाळेत घडलेल्या या प्रकारा सारखाच प्रकार पंधरा दिवसापूर्वी नगरपालिकेच्या मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 2 मध्ये घडला होता पालिकेचे मुख्याधिकारी शाळेत भेट देण्यासाठी आले असता दोन शिक्षक मद्यप्राशन करून असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यावेळी सदर शिक्षकाला नोटीस बजावून सोडण्यात आले दारू पिऊन शाळेत आढळलेले ते दोन गुरुजी कोण याबाबत शहरात खमंग चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Akola City Bus
Balapur Soybean Crop
MLA Randhir Savarkar discusses the restructuring of the Agriculture Department with officials at the Agriculture Minister’s office.
MSEDCL deputy executive engineer caught in ACB bribe case
Marathi News Esakal
www.esakal.com