

अकोला : सध्या चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस’ (एचएमपीव्ही) या आजाराच्या विषाणूचा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा एचएमपीव्ही व्हायरसबाबत अलर्ट मोडवर आहे. अद्याप महाराष्ट्रात एचएमपीव्हीचा रुग्ण आढळलेला नसला तरी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.